Saturday, May 31, 2008

स्वामी ....

ऐलतीरावर सुख। पैलतीरीं नांदे दुःख ।

मधें वाहतें जीवन । हेंच संसाराचे रूप ।।

ताटातुटीसाठीं का रे । देवा खेळ हा मांडीला ।।

देवपणा सांग त्यांने । तुझा खरा काय झाला ?

विघ्नहर्त्या विनायका । तुला पार्वतीची आण ।

रमा-माधवा संभाळ तुझे आठवीण गुण ।।

रणजीत देसाई यांच्या 'स्वामी' या कादंबरीतून ...

स्वामी ....

आज आकाशाचा डोळा । कशानं ग ओला झाला ।

देव राहिला राउळीं । भाव वनवासी झाला ॥

ध्रुव कसा ग ढळला । चंदनाचा दाह झाला ॥

आज सती जानाकीचा । त्याग रामराये केला ॥

क्षितिजाला दुभगून । रथ जानाकीचा गेला ।

सुकलेल्या आसवांत । राजा आयोध्याचा न्हाला ॥

सदाशिवभाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे हे विरह गीत, रणजीत देसाई यांच्या 'स्वामी' या कादंबरीतले आहे....

Friday, May 9, 2008

भावना

''भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीच गरज नसते.........''
कधी कधी ङोळेही खुप काही बोलुन जातात......"
"अनावर होतात जेव्हा त्या भावना.....
मूके अश्रु ही बोल्के होतात,शब्द दूर निघून जातात...."

राधा ही बावरी...

राधा ही बावरी हरीची
रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll

बोलताही येत नाही...

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही....