Wednesday, May 30, 2007

गणित जीवनाचं...

जिवन हे एक गणितच असतं
ते हसत हसत सोडवायचं असतं
कधी कुणाच्या सोबतीने
कधी एकट्यानेच जगायचं असतं

प्रेम, राग, द्वेष, लोभ
असे त्यात अंक असतात
ज्याची जिथे योग्य जागा
तिथेच ते ठेवावे लागतात

एक जरी पायरी चुकलात तरी
संपुर्ण गणितच मग चुकते
सुख-दुःखाची बेरीज-वजाबाकी करत
धैर्याने पुढे चालावे लागते

जिवन हे असे गणित आहे
जे कधीच सुटत नसतं
तरीही....
कधी उत्साहाच्या लाटेवर
कधी वेड्या आशेवर
कधी पडण्यासाठी
कधी पडून पुन्ह उठण्यासाठी
कधी कुणाला हसविण्यासाठी
कधी कुणाचे अश्रू पुसण्यासाठी
कधी आपल्यासाठी
तर कधी दुसर्यांसाठी
मरेपर्यंत जगायचं असतं

नाही....
मरेपर्यंत जगण्यासाठीचं असतं
....जगण्यासाठीच असतं

जिवन हे गणितचं असतं
ते हसत हसत सोडवायचं असतं
हसत हसत जगयाचं असतं

1 comment:

asmianaya said...

Samjh aay thoda thoda. Xen par kaam kar raha hia kya?